Pune Nagar Highway, No Parking Zone saam tv
मुंबई/पुणे

Pune Nagar Highway : वाघेश्वर चौक ते लाईफलाईन हॉस्पिटलपर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग झाेन; जाणून घ्या कारण

नागरिकांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात 9 जूलैपर्यंत कळवावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Nagar Highway Traffic Updates : पुणे - नगर महामार्गावर वाघोलीत होणारी वाहतूक कोंडी व महामार्गाच्याकडेला दोन्ही बाजूंनी वाहनांची पार्किंग करून महामार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होताे. यामुळे वाघोलीमधील वाघेश्वर चौक ते लाईफलाईन हॉस्पिटलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस प्रायोगिक तत्त्वावर नो पार्किंग (Wagheshwar Chowk and Lifeline Hospital will be a no-parking zone) करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर (Vijaykumar Magar) यांनी तात्पुरत्या स्वरुपात आदेश काढले आहेत.(Maharashtra News)

पुणे नगर रोडवर वाघोलीमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनचालक वाहने पार्क करून महामार्गाच्या मुख्य वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात.

या वाहनांच्या होणाऱ्या पार्किंगमुळे वाघेश्वर चौक ते लाईफलाईन हॉस्पिटल दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आले असल्याचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक पोलीस, रुग्णवाहिका,फायरब्रिगेड सेवेतील वाहंनाना वगळण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT