निती आयोगाचा तिसऱ्या लाटेसंबंधीचा तो अहवाल जून महिन्यातील  Saam Tv news
मुंबई/पुणे

तिसऱ्या लाटेबाबत सध्या काळजी करण्याची गरज नाही: राजेश टोपे

निती आयोगाचा तिसऱ्या लाटेसंबंधीचा तो अहवाल जून महिन्यातील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिसऱ्या लाटेचे भीषण रूप सप्टेंबर (September) महिन्यात दिसू शकते, अशी भीती नीति आयोगाने (Niti Aayog) व्यक्त केली आहे. नीति आयोगाच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात 4 ते 5 लाख कोरोना (Corona) प्रकरणे दररोज येऊ शकतात. असा निती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी खुलासा केला आहे.

हे देखील पहा -

नीती आयोगाच्या ज्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ते जून महिन्यातील पत्र आहे. त्यात आताची कोणतीही माहिती नाही. निती आयोगाने जून महिन्यात तिसऱ्या लाटेबबत अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पॅनिक होऊ नये. राज्य सरकारची तिसऱ्या लाटेसाठी तयारी झालेली असल्याचंही यावेळी राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत त्यांनी राजेश टोपे यांनी यांनी सध्य़ा तरी तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

यासोबतच त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच शाळा, कॉलेज, मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनासंख्या वाढत असली तरी काळजी करण्यासारखे कारण नाही. त्या ठिकाणी लसीकरण वाढण्यात येणार आहे. डेल्टा व्हेरियंटचे संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT