देशात तिसरी लाट येणार; NITI आयोगाचा इशारा

सप्टेंबरमध्ये कोविड संक्रमणाची  दररोज 4 ते 5 लाख प्रकरणे येऊ शकतात.
देशात तिसरी लाट येणार; NITI आयोगाचा इशारा
देशात तिसरी लाट येणार; NITI आयोगाचा इशाराSaam Tv
Published On

तिसऱ्या लाटेचे भीषण रूप सप्टेंबर September महिन्यात दिसू शकते, अशी भीती नीति आयोगाने Niti Aayog व्यक्त केली आहे. नीति आयोगाच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात 4 ते 5 लाख कोरोना Corona प्रकरणे दररोज येऊ शकतात. अशा परिस्थितीत 2 लाख आयसीयू बेडची व्यवस्था केली पाहिजे. गेल्या महिन्यात, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल Dr. V. K. Paul यांनी केंद्र सरकारला Central Government कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काही सूचना दिले होते.

हे देखील पहा-

ज्यामध्ये म्हटले होते की, तिसऱ्या लाटे दरम्यान 100 पैकी 23 कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. यासह, सरकारला 2 लाख आयसीयू बेडची ICU Bed तरतूद करण्याचे सुचवले गेले, ज्यात व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख नॉन आयसीयू बेड (यात ऑक्सिजन क्षमता असलेले ५ लाख बेड्स असावेत) आणि 10 लाख कोविड Covid केअर बेडचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com