Kalu River in Palghar saam Tv
मुंबई/पुणे

पालघरच्या 'या' भागात विकासकामांना खीळ, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पालघर येथील धक्कादायक वास्तव समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रुपेश पाटील

पालघर : येथील धक्कादायक वास्तव समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालघरच्या (Palghar) तलासरी बोरमाळ भेंडीपाडा येथील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नदीवर पूल बांधण्यात आला नसल्याने पाण्याच्या प्रवाहातून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तलासरी, बोरमाळ, भेंडीपाडा या भागात (Development ) विकासकामांना खीळ बसल्याने येथील स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातून अंत्ययात्रा निघालेल्यावर थेट काळू नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या तलासरी, बोरमाळ, भेंडीपाडा या भागाला अनेक समस्यांचा विळखा लागला आहे. येथील परिसरात भक्कम रस्ते, स्मशानभूमी नसल्याने स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंत्ययात्रा निघाल्यावर रस्त्याअभावी नदीच्या पाण्यातून जावे लागते. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास येथील ग्रामस्थ पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर मधील ग्रामीण भागात सोयी सुविधांचा असलेला अभाव आणि त्यांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे .स्मशानभूमी नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागतात.

तलासरी तालुक्यातील बोरमाळ भेंडीपाडा येथील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे .दोन दिवसांपूर्वी बोरमाळ भेंडीपाडा येथील वयोवृद्ध असलेले मंगू धोडी यांचा मृत्यू झाला .मात्र या पाड्यात स्मशानभूमी नसल्याने आणि नेहमीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी रस्ता नसल्याने मंगू धोडी यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह खांद्यावर घेत काळू नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून हा मृतदेह दुसऱ्या बाजूला नेला .त्यानंतर या मृतदेहावर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . भेंडीपाडा येथे मागील अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार कराव्या लागणाऱ्या जागेला जोडणारा पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र सरकारकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना सिग्नल, ना ट्रॅफिक; मुंबईतून थेट २५ मिनिटांत गाठा ठाणे, प्रकल्प कधी पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडेंविरोधात धुळ्यात मराठा समाज आक्रमक

ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासलंय त्यांच्यावर काही बोलायचं नाही उदय सामंत यांचा रोख कोणाकडे? VIDEO

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

Mumbai food: गरम चहा आणि बन मस्का....! मुंबईतील सुप्रसिद्ध इराणी कॅफेंना एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT