Nitesh Rane vs Aditya Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Nitesh Rane News: आदित्य ठाकरे देश सोडून पळणार, लवकर पासपोर्ट जप्त करा; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane vs Aditya Thackeray: आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार आहेत. त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Satish Daud

Nitesh Rane on Aditya Thackeray

आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार आहेत. त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढावी तसेच त्यांचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राज्य सरकार सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान यांना न्याय देण्याचं काम करतंय, असंही राणे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार अदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दिशा सालियन प्रकरणात मी पेन ड्राईव्ह दाखवला होता. तोच पेन ड्राईव्ह मी एसआयटीकडे देणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"माझ्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व फोटो आणि व्हिडीओ आहेत. त्यामुळे एसआयटी तपासाला मदत होईल. त्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरील आरोप सिद्ध होतील. मला विश्वास आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपी पकडले जातील आणि त्यांना शिक्षा मिळेल", असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला.

नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी का केली नाही? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

खासदार संजय राऊत यांना धनुष्यबाण चिन्हावर बोलण्याचा अधिकार नाही. मशाल चिन्ह नको म्हणून त्यांच्या घरात भांडण सुरू आहेत. त्यांचे बंधू मशाल चिन्हावर निवडणूक लढणार की शरद पवार यांच्या चिन्हावर? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना सुद्धा कमळासोबत येण्याची इच्छा आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT