Nitesh Rane- Sunil Prabhu Saam TV
मुंबई/पुणे

अहो प्रभू जामीन मंजूर, कळवा तिकडे; नितेश राणेंचा सुनील प्रभूंना टोला

मात्र यावर फार काही न बोलता सुनील प्रभू हसत पुढे निघून गेले.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई: राणे कुटूंब आणि शिवसेना हा वाद काही महाराष्ट्राला नवा नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून हा वाद आणखीनच चिघळला आहे. त्यातच आता आणखी भर पडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे यांना आज अटक पूर्व जमीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेना आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना विधान भवन परिसरात मिस्कील टोला लगावला. विधानभवन परिसरात नितेश  राणे (Nitesh Rane) आणि सुनिल प्रभु एकमेकांसमोर आले. यावेळी नितेश राणे यांनी अहो प्रभू जामीन मंजूर झाला आता वरच्यांना सांगा असे म्हणत मिस्कील टोला हाणला. मात्र यावर फार काही न बोलता सुनील प्रभू हसत पुढे निघून गेले.

नेमकं काय आहे प्रकरण

दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर करत मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दिशा सालियनच्या आईनं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आज दिंडोशीतील सत्र न्यायाधीश एस. यू. बघेल राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT