chikungunya test camp in dehu saam tv
मुंबई/पुणे

देहूत प्रशासन सतर्क; चिकुनगुनियाचे नऊ, डेंग्यूचे आढळले तीन रुग्ण

नागरिकांनी देखील घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिलीप कांबळे

देहू : देहू नगरीत सध्या चिकुनगुणीया आणि डेंगूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. सध्या देहू नगरपंचायतीच्या हद्दीत नऊ चिकुनगुनियाचे (chikungunya) तर तीन डेंगूचे (dengue) रुग्ण आढळले आहेत. दरम्यान अवघ्या काही दिवसांवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. या पालखी सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) हे देहूच्या (dehu) शिळा मंदिराचे लोकार्पण साेहळ्यासाठी येत आहेत. या पार्श्वभुमीवर आराेग्य (health) विभाग सतर्क झाले आहे. (dehu latest marathi news)

देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील विठ्ठलवाडी भागांतील पाण्याच्या टाकी जवळच्या भागात चौदा मे पासून चिकुनगुनीया सदृश लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. याचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतर यात नऊ चिकुनगुनियाचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. चिकुनगुनियाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने तातडीने ठाेस पावले उचलली आहेत. यामध्ये संबंधित बाधित परिसरात कोरडा दिवस पाळणे व धूर फवारणी करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून देहू नगरी निरोगी ठेवण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. नागरिकांनी देखील घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. नियमितपणे एक दिवस कोरडा पाळावा असे आवाहन डॉ. किशोर यादव (प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT