Nilesh Rane Saam TV
मुंबई/पुणे

Nilesh Rane News : निलेश राणेंचा राजकारणाला 'जय महाराष्ट्र'; दसऱ्याच्या दिवशी मोठी घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनील काळे

Mumbai News :

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशीच मोठा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी देखील निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलेश राणे यांची पोस्ट

'नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.'  (Latest Marathi News)

'BJPमध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.'

'निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT