BJP Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : निलेश राणेंनी राजकारण सोडण्याचा तडकाफडकी निर्णय का घेतला? भाजपच्या बड्या नेत्यानं नेमकं कारण सांगितलं

Nilesh Rane News : निलेश राणेंच्या राजीनाम्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी आज निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर

Mumbai News :

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी तडकाफडकी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला, याबाबत सर्वत्र चर्चा होती. एका बड्या नेत्यासोबतचे मतभेद हे यामागील कारण असल्याचे सांगितले जात होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी समजूत काढल्यानंतर राणेंची नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले जात असून, ते लवकरच निर्णय मागे घेतील अशी शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलेश राणेंच्या राजीनाम्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी आज निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती देखील समोर येत आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तासभर सविस्तर चर्चा झाली. (Latest News)

रविंद्र चव्हाण यांनी या भेटीनंतर बोलताना म्हटलं की, खरंतर काल निलेश राणे यांनी ट्वीट केल्यानंतर काय घडलं कळालं नव्हतं. आताच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर काही गोष्टी कळाल्या आहेत. संघटनेत काम करत असताना छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली.

या सर्व गोष्टींचा आम्ही सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा आम्ही विचार करत असतो. पण अनेक छोट्या निवडणुका या कार्यकर्त्यांना लढायच्या असतात. ते आम्ही जाणून न घेतल्याने कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी निलेश राणे यांनी हा निर्णय घेतला, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

एक कार्यकर्तादेखील पक्षातून बाहेर जाणे पक्षासाठी योग्य नाही. सांगायला आनंद होत आहे की हा झुंझार नेता कोकणात असाच दिसेल. सर्व छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे असते आणि हीच भूमिका निलेश राणे यांची होती, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.

फडवीसांकडून दोन्ही नेत्यांची कानउघडणी

अंतर्गत धुसफूस समोर आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांची कानउघाडणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत कलह नको, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित नेत्यांना केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT