Pune Crime : खुळखुळा झालेल्या खाकीला गंडवून निलेश घायवळ परदेशात पळला.... आणि त्यानंतर पोलिस यंत्रणा जागी झाली.. मात्र हाच मकोकाचा गुन्हेगार मुलांच्या शिक्षणासाठी परदेशात गेला असून तो 100 टक्के पुन्हा भारतात येणार आहे, असा दावा घायवळच्या वकीलानं केलाय.
दुसरीकडे 18 सप्टेंबरला झालेल्या कोथरुड गोळीबार प्रकरणाशी घायवळचा कुठलाच संबंध नाहीय..दबावाखाली येऊन पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोपही घायवळच्या वकीलानं केलाय...मात्र घायवळच्या वकीलानं केलेले आरोप पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेटाळून लावलेत...
मुळात खंडणी, टोळीयुध्द, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं असे अनेक गुन्हे घायवळच्या नावावर आहेत.. तरीहीसुद्धा वकीलानं उलट्या बोंबा का ठोकल्यात? पुणे पोलिसांनी वकीलाचा दावा फेटाळून लावल्यानंतर तरी वकीलाच्या दाव्यानुसार घायवळ भारतात येणार का? आणि तो आला नाही तर पुणे पोलिस परदेशात घायवळच्या मुसक्या आवळून त्याला फरफटत घेऊन येणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.