Lockdown In Maharashtra: राज्यता काय बंद, काय चालू हे रात्री कळणार; आज रात्रीपासून नवी नियमावली? SaamTV
मुंबई/पुणे

Lockdown In Maharashtra: राज्यता काय बंद, काय चालू हे रात्री कळणार; आज रात्रीपासून नवी नियमावली?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - महाराष्ट्रातील (Maharashtra)वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झाले असून राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास आता सुरुवात केली आहे. त्या पार्श्ववभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज एक महत्त्वाची बैठक घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन जरी नसले तरी मात्र निर्बंध कडक करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. ( Lockdown In Maharashtra Update)

हे देखील पहा -

राज्यात संध्याकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत राज्यात जमावबंदी आहे. मात्र, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. याबाबद आज रात्री नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवला जाईल त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यातील कोरोनाचा आकडा

राज्यात गेल्या 24 तासात 18,466 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात 66,308 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ओमिक्रॉनचे नवे 75 रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासात 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. दरम्यान, राज्यातील ओमिक्रोन बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 653 वर गेली आहे. यातील 259 जणांनी ओमिक्रॉनवर मात यशस्वी मात केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT