पुणे - महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुण्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार पाडले आहे. महापालिकेतील कॉंग्रेसचे (Congress) गटनेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांचे पुतणे प्रणय शिंदे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी प्रणय शिंदे (Pranay Shinde) यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील पहा -
पक्ष प्रवेशानंतर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे आज प्रत्येकजण भाजपशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजप आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह पंतप्रधानांची कामे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे.
तर प्रणय शिंदे यांच्या पक्ष प्रवेशावर जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे नुकसान होत नाही. उलट अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपचे संघटन मजबूत होण्यास अजून मदत होणार आहे.
भाजपचे विचार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजप युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा राघवेंद्र मानकर यांनी केली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.