Deepali Sayed News Saam TV
मुंबई/पुणे

Deepali Sayed: ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद नेमक्या कुणाकडून? रांगोळीतून दिले संकेत

Deepali Sayed Latest News: दिवाळीनिमित्त रांगोळी रेखाटनं ही काही अजब गोष्ट नाही. पण, राजकीय नेते अनेकदा आपलं म्हणणं हे आपल्या कृतीतून किंवा थेट न बोलता विविध माध्यमातून संकेत देत असतात.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Deepali Sayed Latest News: शिवसेनेच्या नेत्या आणि मराठी अभिनेत्री असलेल्या दिपाली सय्यद या सध्या आपल्या राजकीय भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दिपाली सय्यद (Dipali Sayed) या उद्धव ठाकरे गटातच राहिल्या होत्या. पण, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यानंतर त्यांनी मातोश्रीत माझा आवाज दाबला गेला असा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात जाऊ शकतात असा तर्क लावला गेला. पण, आता दिपाली सय्यद यांनी आता आपण कुठल्या पक्षात जाणार आहोत याबाबत एक सूचक इशारा दिला आहे. त्यांनी रेखाटलेली रांगोळी ही या चर्चेचा नवा विषय बनली आहे. (Dipali Sayed Rangoli News)

दिपाली सय्यद यांनी फेसबुकवर काही फोटोज शेयर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये त्यांनी रेखाटलेली रांगोळी दिसत आहेत. आता दिवाळीनिमित्त रांगोळी रेखाटनं ही काही अजब गोष्ट नाही. पण, राजकीय नेते अनेकदा आपलं म्हणणं हे आपल्या कृतीतून किंवा थेट न बोलता विविध माध्यमातून संकेत देत असतात. दिपाली सय्यद या ठाकरे गटात (Uddhav Thackeray) नाराज असल्याची चर्चा होती. त्यात त्यांनी २३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, ''मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही.'' असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार, असं दिसून येत आहे. (Shivsena Latest News)

मात्र, आता दिपाली सय्यद उद्धव ठाकरे गट अथवा एकनाथ शिंदे गट या दोन्हीपेक्षा तिसरा पर्याय निवडतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे. याचं कारण म्हणजे, दिपाली सय्यद यांनी 'कमळा'बद्दल दाखवलेलं प्रेम. होय दिपाली सय्यद यांनी दिपावलीनिमित्त आपल्या घरासमोर रांगोळी रेखाटली. या रांगोळीत त्यांनी कमळ हे चित्र काढलं. कमळ हे भाजपचं चिन्ह आहे. एखादी राजकीय व्यक्ती अनेकदा थेट न बोलता आपल्या कृतीतून काही संकेत देत असते. यानुसार दिपाली सय्यद या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये जाईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. किंवा दुसऱ्या शक्यतेनुसार त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची दाट शक्यता आहेत. (Deepali Sayed is an Indian Maharashtrian actress, well known for her role in the varous Marathi film)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT