Pune police are investigating the death of an 18-year-old student, with exam-related stress emerging as a possible angle. 
मुंबई/पुणे

Neet Exam: पुण्यात १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या;राहत्या घरात घेतला गळफास

Girl End Her life In Pune: पुण्यातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. परीक्षेचा ताण आणि 'नीट' (NEET) मधील कमी गुण हे यामागील कारण असू शकते असा पोलिसांचा संशय आहे.

Akshay Badve

  • पुण्यातील काळेपडळ परिसरात १८ वर्षीय अनुष्का चौगुले हिने आत्महत्या केली.

  • तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली.

  • नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील काळेपडळ भागात एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. राहत्या घरातच गळफास घेत या तरुणींनी आत्महत्या केली आहे. अनुष्का चौगुले अस आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीने टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. परंतु नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

नीट परीक्षेचा निकाल जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET UG गुरुवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालासोबतच कट-ऑफ गुण, गुणवंतांची यादी (टॉपर्सची यादी) आणि अंतिम उत्तरतालिका (final answer key) देखील प्रसिद्ध केली आहे. आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून संयुक्तपणे NEET UG परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.

१९ विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण मिळवले

यावर्षी परीक्षेत एकूण १९ विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, ६९० हून अधिक गुण मिळवणाऱ्या १३८ विद्यार्थ्यांपैकी ९३ टक्के विद्यार्थ्यांनी 'नीट-यूजी' (NEET-UG) परीक्षा पहिल्यांदाच दिली होती. या वर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षा दिली.

पात्र ठरलेल्या एकूण ११.२१ लाख उमेदवारांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक महिला होत्या. अशाप्रकारे या वर्षी NEET UG परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या (मुलांच्या) तुलनेत अधिक होते. ५७ टक्क्यांहून अधिक महिला या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५५ टक्के इतके नोंदवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT