रावणाला ही वाटत असेल हा माझ्या तावडीत सापडायला हवा; नीलम गोऱ्हेंचा सोमय्यांवरती घणाघात ! SaamTV
मुंबई/पुणे

रावणाला ही वाटत असेल हा माझ्या तावडीत सापडायला हवा; नीलम गोऱ्हेंचा सोमय्यांवरती घणाघात !

किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : 'किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आजच्या दिवशी रावण दहन करत आहेत. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत भेटायला हवा. किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत रोजगार म्हणून रोज काहीतरी काहीतरी ते करत असतात' अशी बोचरी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी (Neelam Gorhe) किरीट सोमय्यांवरती केली आहे. त्या शिवसेनेच्या दसरा मिळाव्यात बोलत आहेत. (Neelam Gorhe's criticism of Kirit Somaiya)

हे देखील पहा -

शिवसेनेचा परंपरागत 'दसरा मेळावा' Shivsena Dasara Melava मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. या मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्व शिवसैनिकांच लक्ष लागून राहिलं आहे. मात्र मुख्यमंत्री बोलायच्या आधईच नीलम गोऱ्हेंनी किरीट सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सोमय्यांना रोजगार नसल्याने ते काहीना काही करत बसतात असं गोर्हे म्हणाल्या तसंच शिवसेना आपले दायित्व साजरे करत आहे काही परप्रांतीयांना आणून राजकारण करत आहेत. शिवसेना ही मुंबईची आई आहे काही जण दाई ची भूमिका घेत आहेत. असल्याचा टोलाही त्यांनी य़ावेळी लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT