Yakub Memon latest news Saam TV
मुंबई/पुणे

Yakub Memon: याकूब मेमनच्या कबरीवरून राष्ट्रवादीचा भाजपवर गंभीर आरोप

'जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून भाजप आमदार राम कदम यांनी जाणीवपूर्वक जुना फोटो ट्वीट केला आहे हे दुर्दैवी.'

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election) डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण कशी होईल हा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपवर केला आहे. ते आज आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले शिंदेसरकारने 'आत्महत्यामुक्त' महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले. हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे अशी टीका

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर बगल देण्याचे काम होत असून शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांची कमतरता, पालकमंत्र्यांची न झालेली नेमणूक व कॅबिनेटचा रखडलेला विस्तार हे सगळे विषय पडून असून त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी (NCP) सातत्याने ईडीसरकार व मोदी सरकारविरोधात आंदोलने करत आहे. बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यात पाहिला तर ८.३ टक्क्यावर पोचला आहे. महागाई व बेरोजगारीवर मोदीसरकार बोलताना दिसत नाही. बेरोजगारी व महागाईने एवढा उच्चांक गाठला आहे की मोदीसरकार अक्षरशः अपयशी ठरलं असल्याचंही तपासे म्हणाले.

तसंच मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election) डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण कशी होईल हा प्रयत्न करत आहे. ३० जुलै २०१५ मध्ये नागपूरमध्ये याकूब मेमनला (Yakub Memon) फाशी देण्यात आले. त्यावेळी कुणाचे सरकार होते. याकूब मेमन याचे शव कुणाच्या सरकारने नातेवाईकांना दिले हे सांगण्याची गरज नाही असा टोलाही महेश तपासे यांनी यावेळी लगावला.

भाजप खोटेनाटे आरोप करुन मविआच्या घटक पक्षांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र करत आहे. याकुब मेमनप्रकरणी भाजप उध्दव ठाकरे आणि शरद पवार (Uddhav Thackeray and Sharad Pawar) यांचे नाव वापरत आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून भाजप आमदार राम कदम यांनी जाणीवपूर्वक जुना फोटो ट्वीट केला आहे हे दुर्दैवी असल्याचही तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे दिनांक १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणुका यावर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT