Mahesh tapase On Pankaja Munde  Saam tv
मुंबई/पुणे

Mahesh tapase: 'पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपकडून दुजाभाव, पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत करू'; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ऑफर?

Mahesh tapase News: 'पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपकडून दुजाभाव होत आहे. त्यामुळे त्यांचं पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत करू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Mahesh tapase on Pankja Munde:

भाजप नेते पंकजा मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी मोठं वक्तव्य केलंय. 'मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मोठं वक्तव्य करत ऑफर दिली आहे.

'पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपकडून दुजाभाव होत आहे. त्यामुळे त्यांचं पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत करू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, असे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे यांनी म्हटलं की,'पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने सातत्याने दुजाभाव हा 2014 पासून आपण बघतोय. त्या राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे जनतेला आस्था आहे'.

'भाजपात महिलांना काय स्थान दिले जाते, किती प्रोत्साहन दिले जाते? असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे. पंकजा मुंडे काही भूमिका घेत असेल तर त्याचा विचार भाजपनं केला पाहिजे पाहिजे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येत असतील तर त्यांचं स्वागत करू, असेही तपासे यांनी सांगितले .

...तर हिवाळी अधिवेशनाला दुसराच मुख्यमंत्री असेल : महेश तपासे

आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर महेश तपासे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधिमंडळ अध्यक्षांकडे सुनावणी सत्र सुरू आहे, याबाबत 13 ऑक्टोबर रोजी दुसरी सुनावणी होणार आहे.

यावर भाष्य करताना तपासे म्हणाले,'नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे, संविधानाच्या अनुषंगाने अध्यक्षांनी जर निर्णय दिला, तर येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून बसणार नाहीत. त्यामुळे पुढच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला दुसराच मुख्यमंत्री असेल, असे भाकीत तपासे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT