Pune: राज्यपालांविरोधात पुणे मनपाच्या दारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: राज्यपालांविरोधात पुणे मनपाच्या दारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरले आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरले आहे. राज्यपालांच्या (Bhagat Singh Koshyari) या वक्तव्याचा जागोजागी निषेध करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर देखील आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते राज्यपालांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत आहे. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असे वक्तव्य राज्यपालांनी (Governor) औरंगाबाद मधील एका कार्यक्रमामध्ये काल केले आहे. (NCP sit agitation door Pune Municipal Corporation against Governor)

हे देखील पहा-

राज्यपालांच्या (Bhagat Singh Koshyari) या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक प्रमुख नेत्यांनी या विरोधामध्ये रोष व्यक्त करत माफीची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या वक्तव्याचा निषेध करत शरद पवारांनी मागे केलेले एक वक्तव्य याबाबतचा खुलासा म्हणून ट्विट केले आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी म्हणले आहे की, खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असे होत असेल गप्प बसणे हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल माफी मागा, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या (Bhagat Singh Koshyari) विरोधामध्ये घोषणाबाजी करत पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे. यामुळे याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसाअगोदर किरीट सोमय्यांना झालेला धक्काबुक्की आणि यानंतर करण्यात आलेला सत्कार यामुळे पुणे महापालिका चर्चेत आली आहे. यानंतर आता परत एकदा प्रवेश दारातच हे आंदोलन करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT