Yogesh Sawant Saam TV
मुंबई/पुणे

Politcal News : देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक

Sharad Pawar Group News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड | मुंबई

Mumbai News :

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे शरद पवार गटाच्या नेत्याला महागात पडलं आह. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण?

एका मराठा आंदोलकाने 'गावरान विश्लेषक' यूट्युब चॅनलवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये या अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांबाबत एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. योगेश सावंत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या चॅनेलवर कारवाई करण्याआधीच अगोदर योगेश सावंत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिवसैनिक अक्षय पानवलकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. अक्षय यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. योगेश सावंत यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी याबाबत म्हटलं की, योगेश सावंत आमचाच कार्यकर्ता आहेत, त्याने काय चूक केली हे सांगावं. योगेश सावंत शरद पवार साहेबांच्या बाजूने लढत आहे. त्यांच्यावर काल कारवाई केली. पोलिसांना त्याला काल पोलीस स्टेशन नेलं. तिथे त्याला एक दिवस ठेवलं आणि आज कोर्टात हजर केलं जात आहे. मी स्वत: त्याला भेटायला जात आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT