Kalyan Politics : आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना गुलाल लागला, तो आम्ही काढून घेऊ; सुषमा अंधारेंचं थेट आव्हान

Sushma Andhare News : ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
Sushma Andhare vs Shrikant Shinde
Sushma Andhare vs Shrikant Shinde Saam tv
Published On

अभिजीत देशमुख | कल्याण

Kalyan Politics :

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषामा अंधारे यांनी थेट श्रीकांत शिंदे यांना आव्हान दिलं आहे. आमच्यामुळे श्रीकांत शिंदे यांना इथून (कल्याण लोकसभा मतदारसंघ) गुलाल लागला होता.आम्ही तो गुलाल काढून घेऊ शकतो. आम्ही ते करून दाखवू, असा इशारा सुषमा अंधारे यांनी कल्याणमधील जाहीर सभेत दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सभेत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा अंतर्गत शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी १० ते १२ ठिकाणी भेटीगाठी घेतल्या.   (Latest Marathi News)

Sushma Andhare vs Shrikant Shinde
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याची तारीख ठरली; गोदावरीच्या आरतीसह करणार काळारामाचे दर्शन

आठवडाभरात कल्याण लोकसभेचा उमेदवार जाहीर होईल

ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे  यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते.

परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत माहिती पोहोचलेले नाही. कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचा प्रचार मी करेन. मी या मतदारसंघात तळ ठोकून राहील, याचा अर्थ असा नाही की मी लगेच निवडणूक लढणार आहे. उमेदवारी जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे.

पुढील ८ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल. जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील, असं देखील सुषमा अंधारे यांनी सांगितले.

Sushma Andhare vs Shrikant Shinde
Lok sabha Election 2024 : महाविकास आघाडीचं ठरलं! आता एकच बैठक होईल; संजय राऊतांनी सांगितली लोकसभेसाठीची पुढची दिशा

कल्याण पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा

सुषमा अंधारे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही शिवसैनिकांना नोटीस पाठवल्या होत्या. या नोटीसांबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना देण्यात आलेल्या नोटीसीची भाषा अत्यंत हास्यस्पद आहे.

तर शिवसैनिकांमध्ये खच्चीकरण करण्यासाठी दहशतीचे वातावरण तयार करण्यासाठी जर नोटीसा देण्यात आल्या असतील तर त्याला उत्तर देणे गरजेचे होतं. शिवसैनिक नाउमेद न होणे ही माझी जबाबदारी असल्याचे अंधारे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com