Sharad Pawar vs Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar : अच्छे दिन लोकांना पाहायलाच मिळाले नाही; शरद पवारांचा भाजपला टोला

शरद पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

साम टिव्ही ब्युरो

ठाणे : भाजपने 2014 ला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अच्छे दिन येणार असं म्हणत भाजपने (BJP) आश्वासनं दिली होती. अच्छे दिन लोकांना पाहायला मिळालेच नाही, उलट भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. (Sharad Pawar Todays News)

काय म्हणाले शरद पवार?

2014 मध्ये भाजपने जनतेला अनेक विकासकामांची आश्वासनं दिली होती. अच्छे दिन येणार असं म्हणत भाजपने ही आश्वासने दिली होती. मात्र आतापर्यंत लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही. असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला. इतकंच नाही तर, पवारांनी यावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनाची यादी देखील वाचून दाखवला.

2022 पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचं पक्कं घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल, अशी आश्वासने भाजपने जनतेला दिली होती. मात्र भाजपने सांगितलेली एकही आश्वासने अजून पूर्ण केली नाही. असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील 30 टक्के घरात अजूनही शौच्छालये नाहीत. असंही शरद पवार म्हणाले. (PM Narendra Modi Todays News)

पवारांनी बिल्किस बानो प्रकरणावरूनही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना कोर्टाने शिक्षा सुनावली. मात्र गुजरात सरकारने त्यांना सोंडून दिलं. देशात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढत आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी मोदी सरकारकडून कुठलेही प्रयत्न केले जात नाहीये. अशी टीकाही शरद पवार यांनी केली. (Sharad Pawar vs Narendra Modi)

भाजपकडून ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांवर दबाव आणल्यासाठी केला जात असल्याचा आरोपही शरद पवारांनी केला. कर्नाटकात भाजपचं सरकार नव्हतं. तेथील नेत्यांवर दबाव आणून भाजपने सरकार पाडलं, देशातील अनेक राज्यात अशीच परिस्थिती आहे. असंही शरद पवार म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT