Ramdas kadam and amol mitkari  saam tv
मुंबई/पुणे

'तुमच्या पराभवाचं खापर हे...'; अमोल मिटकरी यांचा रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल

हकालपट्टीनंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आमदार अनिल परब आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तर कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली. त्यानंतर रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अनेक माजी आमदारांचाही शिंदे गटाकडे कल वाढत चालला आहे. ज्या नेत्यांकडून शिंदे गटाला साथ दिली जात आहे, त्यांना शिवसेनेकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. शिवसेनेने माजी आमदार रामदास कदम यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आमदार अनिल परब आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तर कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली. त्यानंतर रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी निशाणा साधला आहे. (Amol mitkari News In Marathi)

काल माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्र लिहून काल शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका केली. मला व माझा मुलगा आमदार यागेश कदम यांचाही वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला. तसेच रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रामदास कदमांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, 'रामदास भाई तुमच्या पराभवाचं खापर हे अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर फोडू नका. शिवसेनेतून तुमची हकालपट्टी का केली, यावर चिंतन करा. अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर बोलताना जपून शब्द वापरावे. शिवसेना संपवायला भाजप निघाली आहे. आम्ही त्या वृतीचे लोक नाहीत. तुमच्यातील शिवसैनिक जागा झाला असेल, तर भाजपच्या लोकांना जाब विचारा. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना संपवत आहेत, इतरांवर खापर फोडू नका'.

काय म्हणाले होते रामदास कदम ?

'उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्यामुळे शिवसेनेवर सध्या ही परिस्थिती आली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीला (NCP) सोडले पाहिजे. महाविकास आघाडी पाच वर्ष टिकली असती तर शिवसेना संपली असती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेना टिकली आहे. आमचे शिवसेनेसाठी योगदान आहे, ५० वर्ष आम्ही शिवसेनेसाठी घालवली आहेत', असे रामदास कदम म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT