rohit pawar  saam tv
मुंबई/पुणे

'डोक्यावरचे गेलेले केस...';रोहित पवारांनी सांगितला कार्यकर्त्याचा किस्सा, कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ

आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्याचा किस्सा सांगितला. त्यानंतर कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ झाला.

रोहिदास गाडगे

Rohit Pawar News : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील राजगुरूनगर येथील एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यकर्मात आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्याचा किस्सा सांगितला. रोहित पवार यांनी किस्सा सांगितल्यानंतर कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ झाला. (Latest Marathi News)

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राजगुरुनगर येथील नवरंग कलेक्शन कपड्याच्या दुकानाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या दुकान्याच्या उद्धाटनाप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. 'डोक्यवरचे केस गेले आहेत, तुमचा आशीर्वाद असला की तेही परत येतील', असं कार्यकर्ता म्हणाल्यावर रोहित पवारांनी भर सभेत त्याचा किस्सा सांगितला. त्यावेळी कार्यकर्त्याला दिलेले उत्तर रोहित पवारांनी कार्यक्रमात सांगितले.

'शरद पवार आणि अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीतून ते काहीही करु शकतात. तुमच्या मनात असेल तर ते करण्याच्या नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू शकतो. पण डोक्यावरचे गेलेले केस परत कसे आणतात हे आम्हाला कळत नाही, रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला दिलेल्या या उत्तराने कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ झाला.

पवार कुटुंबात फूट पाडू इच्छिणाऱ्या विरोधकांना देखील रोहित पवारांनी टोला लगावला. 'कुटुंब एक असल्यास ती खरी ताकद असते. राजकारणात अनेकांनी पवार कुटुंबीयांना स्वप्नात कधीच तोडलं, पण स्वप्नात तोडलं तरी आम्ही एक आहोत, असं म्हणत पवार कुटुंब एक असल्याचे सांगत पवार कुटुंब तुटल्याची स्वप्न पाहणाऱ्यांना टोला लगावला.

'समाजात आणि राजकारणात भांडण लावणारे अनेक जण भेटतील. कारण त्यांचं भांडण लावल्याशिवाय काही शिजतच नसतं. कारण त्यांना सकारात्मक काही दिसत नाही. त्यातून भांडण लावून कुटुंब फोडण्याचे काम केलं जात असल्याचे स्पष्ट मत रोहित पवारांनी व्यक्त केले. तसेच कुटुंब एक ठेवून व्यवसायांचा विस्तार करा, असा सल्लाही पवारांनी दिला.

यावेळी रोहित पवार यांनी युवक आणि युवतींना लग्नाचा सल्ला देखील दिली. 'झट मंगनी पट ब्याह' ही संकल्पना ऐकायला चांगली असली, तरी पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही करू नका, असा सल्ला युवक-युवतींना रोहित पवारांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT