Amol Mitkari
Amol Mitkari  SaamTvNews
मुंबई/पुणे

सदाभाऊंची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणाऱ्यासारखी - मिटकरी

प्रदीप भणगे

डोंबिवली : सदाभाऊ खोत यांची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणाऱ्यासारखी झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलीय. सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मिटकरी यांनी हा पलटवार केलाय. अमोल मिटकरी हे आज डोंबिवलीत (Dombivli) राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील यांच्या कार्यालयात आले होते.

हे देखील पाहा :

यावेळी त्यांना सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं असता, सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतुणं हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे का? असा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पिंजरा चित्रपटात गुरुजींनी आधी तमाशाला विरोध केला होता आणि नंतर त्यांनाच तमाशात नाचावं लागलं, तशीच सदाभाऊंची अवस्था झालीये. आगामी काळात भाजपच्या फडात तुणतुणं घेऊन नाचणाऱ्याची सदाभाऊंची भूमिका राहील, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला.

तर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं असता, महाराष्ट्र पोलिसांची (Police) बदनामी करण्याचं भाजपचं सुप्त कारस्थान असल्याचा हा प्रत्यय आहे, असं ते म्हणाले. तसंच नवनीत राणा यांना चहा, पाणी दिल्याचा व्हिडीओ पोलीस आयुक्तांनी ट्विट केला, मग वकील म्हणाले दुसऱ्या पोलीस स्टेशनचा आहे, आता तो व्हिडीओ (Video) सुद्धा आता समोर येईलच. शिवाय दलित असल्यानं अशी वागणूक मिळाली म्हणतात हे धादांत खोटं आहे.

गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना सन्मानाची, इतर कैद्यांसारखी वागणूक दिली. त्यामुळे राणा आत्ताच ऍट्रोसिटी, दलित विषय का आठवला? असा सवाल मिटकरी यांनी केला. मुळात त्या ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, त्यांची कागदपत्रं खोटी आहे हे एकदा तपासलं पाहिजे, कोर्टानं एकदा फटकारलं सुद्धा आहे, असं मिटकरी म्हणाले. तर राणा यांना आत्ताच दलित, संविधान हे सगळं आठवलं हा विरोधाभास आहे, भारतीय जनता पार्टीचं हे षडयंत्र फसलं, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT