NCP delegation saam tv
मुंबई/पुणे

NCP delegation: सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना वगळून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; नेमकं कारण काय?

Delhi political meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भरत मोहोळकर, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे आणि यामागे काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. या निकालानंतर पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार उपस्थित या दोघांच्या अनुपस्थितीत झालेल्या भेटीचा फोटो समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय राजकीय गणित आहे? राष्ट्रवादीत काही मोठे बदल होणार आहेत का? की राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी आहे? अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

भेटीमध्ये काय झाली चर्चा?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नयेत आणि अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात यावे, या दोन प्रमुख मागण्यांवर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Director Death: मनोरंजन विश्वातील तारा हरपला, ज्येष्ठ दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, ठाण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Chocolate Balls Recipe: पार्टी किंवा फंक्शनसाठी घरी बनवा चविष्ट आणि मऊसर चॉकलेट बॉल्स, वाचा रेसिपी

Bank Close : ३ नोव्हेंबरला बँकांना सुट्टी जाहीर! महाराष्ट्रात बँका सुरू राहणार की बंद?

Cycling vs Walking: वजन कमी करण्यासाठी सायकलिंग की वॉकिंग? जाणून घ्या कोणता व्यायाम अधिक फायदेशीर!

SCROLL FOR NEXT