Pune Saam
मुंबई/पुणे

Black Magic: नारळ, बाहुल्या, लिंबू अन् काळा बुक्का; राष्ट्रवादीच्या नेत्याचा घरासमोर महिलेचा अघोरी प्रकार

Black Magic Rituals Performed Outside NCP Leaders Home: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर काळा जादू करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडे परिसरात घडली आहे. धनकवडे यांच्या बंगल्याबाहेर एका अघोरी महिलेने जादूटोण्याचा प्रकार केला आहे. याची माहिती गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याबाहेर नारळ, दहीभात, उकडलेले अंडी, लिंबू, काळा बुक्का, असे काळ्या जादूचे साहित्य आढळून आले आहे. २९ मार्चला रात्रीच्या सुमारास महिलेने थेट धनकवडे यांच्या बंगल्याबाहेर अघोरी विधी केली होती. जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धानका असे अघोरी महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनही ही अघोरी महिला जादूटोण्याचा प्रकार करत आहे. नेमकं अमावस्येच्या दिवशी ही अघोरी महिला धनकवडी परिसरातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर अघोरी प्रकार करत आहे. २९ मार्चला अमावस्येच्या दिवशी ८ वाजता धानका हिने दत्ता धनकवडे यांच्या घराबाहेर अघोरी प्रकार केला. नंतर हे प्रकार उघडकीस आला आहे.

थेट राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या घराबाहेर अघोरी विधी घडल्यामुळे शहरात खळबळ उडली आहे. तसेच यामुळे ही महिला करत असल्याच्या कृत्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने दखल घेतली असून, पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT