Ajit Pawar Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar : तुमच्या घरासमोरच डान्सबार, तो बंद करून दाखवा; अजित पवारांचा शिंदेंना टोला

अजित पवार यांनी आज विधानसभेत भाषण करताना आज पुन्हा एकदा टोलेबाजी केली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यावरून शिंदे (Eknath Shinde) सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत भाषण करताना आज पुन्हा एकदा टोलेबाजी केली. मी ठाण्यातील डान्सबार फोडले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता ठाण्यात सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी शिंदेंना लगावला. (Ajit Pawar vs Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

'मी स्वत: ठाण्यातील डान्सबार फोडले. तेव्हा गुंडांनी मला टार्गेट केलं होतं. पण धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी मला वाचवलं. डान्स बार फोडणारा मी पहिला नेता आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. इतकंच नाही तर, बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं.

अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

एकनाथ शिंदे यांनी डान्सबार फोडल्याच्या या विधानाचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या काळात तुम्ही डान्स बार बंद केले होते. मात्र, आता ठाण्यात तुमच्या घराशेजारीच सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी हाणला. तुम्ही दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू झालेले आहात. कळतच नाही कुठलं नाणं आहे, असा चिमटाही अजित पवार शिंदे-फडणवीस यांना काढला.

'सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही'

'सत्ता आल्यानंतर आनंद होणे हे स्वाभाविक आहे. त्यात दुमत नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले होते की, मी पुन्हा येईन. पण नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती एवढी आली आहे ? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. त्यांच्या कृत्याने संदेश असा जातो की, सर्वच असे वागतात की काय ?'. असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT