Maharashtra Political News saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : निर्भया फंडातील पैशांचा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापर? राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्भया फंड होता. मात्र, या निर्भया फंडाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूरज सावंत

Supriya Sule News : दिल्ली निर्भया हत्याकांडांने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणात संपूर्ण देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आता. त्यामुळे महिला अत्याचारांच्या वारंवार घटनेच्या विरोधात निर्भय फंड तयार करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने २०१३ साली महिला सुरक्षेसाठी निर्भय फंडाची स्थापना केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी हा फंड आहे. मात्र, या निर्भया फंडाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

महिलांच्या सुरक्षेसाठी उपायोजना म्हणून हा फंड तयार करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या निर्भया फंड हा लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुळे यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'निर्भया फंड हा केंद्र सरकारने मनमोहनसिंग यांनी तयारी केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा फंड होता. या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी आणण्यात आलेली वाहने लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी वापरणं हे चुकीचं आणि दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये व्हीआयपी कल्चर लागू होत आहे हे चुकीचं आहे'.

'लोकप्रतिनिधींची सुरक्षा ही महत्त्वाची आहे हे मी मान्य करते. पण त्याचबरोबर दुसऱ्याची सुरक्षा काढून घेणे हे अयोग्य आहे', असेही सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या.

गोसेखुर्द प्रकल्पावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, 'मला वाटतं पंतप्रधानांनी नागपुरात महाराष्ट्रातील आणि देशातील प्रश्नावर बोलायला हवं होतं. बेरोजगारी तसेच महाराष्ट्रातील प्रकल्प जे बाहेर गेले, त्यावर बोलायला हवं होतं. महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट त्यांनी द्यायला हवं होतं. मात्र, तसं काही झालं नाही. एक सामान्य नागरिक म्हणून मी इतकीच अपेक्षा करू शकते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT