Supriya Sule about girl marriage Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule: मुलीच्या विवाहाचं वय १८ वरुन २१ केलं; पण यावर चर्चा व्हावी - सुप्रिया सुळे

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्याचा निर्णय झाला. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अभ्यासावरून या निर्णयाला मंजुरी दिली गेली. त्यावरून अनेक प्रकारची मतमतांतरे येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या विषयावर महाराष्ट्रातही चर्चा व्हायला हवी अशी भुमिका घेतली आहे. (The age of marriage for a girl has been increased from 18 to 21; But this should be discussed - Supriya Sule's demand)

हे देखील पहा -

सुप्रिया सुळे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, केंद्र सरकारला आम्ही विनंती केलीय की घाईघाईनं निर्णय घेऊ नये. अनेकांकडून प्रश्न आले की १८ वय २१ करण्यात काय हाशील आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चर्चा जरुर व्हावी. केंद्राकडे आपली मतं मांडता येईल. महिला धोरण आलं त्यात शरद पवारांसोबतच राजीव गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंचीही महत्वाची भूमिका होती. इतर पक्षांच्या महिलांनाही आमंत्रित केलं होतं. आज या कार्यक्रमाला सर्वच पक्षांच्या महिला प्रतिनीधींनी असायला हव्या होत्या. काही गोष्टी राजकारण बाजूला ठेवून करायच्या असतात असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान मोदी सरकारच्या या निर्णयाला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, वयाची १८ वर्षे पुर्ण झाल्यावर प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्का प्राप्त होतो. जर का १८ वर्षे पुर्ण झालेली एखादी तरुणी मतदानाद्वारे देशाचा पंतप्रधान ठरवण्यास पात्र असू शकते तर ती आपला जोडीदार निवडण्यास अपात्र कशी काय असा सवाल औवैसींनी उपस्थित केला होता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT