sharad pawar  saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही, शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेलं लिखान कोणालाही पसंत पडणारं नाही.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजपने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवारांचं संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिलं. पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेलं लिखान कोणालाही पसंत पडणारं नाही. पण ते कधीकाळी लिहिलेलं होतं ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

ज्या नागरिकांना, व्यक्तींना, घटकांना संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करणं चुकीचं नाही. तर काही घटकांना संभाजीराजे धर्मवीर म्हणून पाहात असेल तर त्याविषयी तक्रार करण्याचं कारण नाही. जेव्हा मी ठाण्याला जातो तेव्हा धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यामध्ये आनंद दिघे सहकारी होते. त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख करण्यावर माझा आक्षेप नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

अजित पवार यांनी काय म्हटलं होत?

छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आपण नेहमी स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, मात्र काही जण जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर असा करतात, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT