Sharad Pawar News in Marathi  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar: महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही, चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यावरुन शरद पवारांची टीका

कधी जातीचं नाव, कधी धर्माचं नाव याचा वापर केला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे.

Dnyaneshwar Choutmal

पुणे : महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही. राज्यातील एका नेत्याने सांगितले की महापुरुषांनी भीक मागितली. पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका केली. ते आज राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलत होते.

लोकांना आज काम करण्याची संधी दिली जात नाही. इथले उद्योग बाहेरच्या राज्यात नेल्या जातात. येथील उद्योकांना प्रोत्साहन दिलं जात नाही. म्हणूनच बेरोजगारीच संकट असून बेरोजगारी वाढत आहे. त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाही. या बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झालाय. सोबतच जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवली जात आहे. लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवलं जात आहे. कधी जातीचं नाव, कधी धर्माचं नाव याचा वापर केला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे.

सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे. अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT