Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik News: नवाब मलिक यांची अवस्था गंभीर; त्यांना नेमकं झालंय काय? वकिलांनी कोर्टात दिली सर्व माहिती

Nawab Malik latest News: मलिक यांना तातडीनं उपचारांची गरज असून त्यांना अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी त्यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टाकडे केली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Nawab Malik News: गोवावाला कंपाऊंड प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. यामुळे मलिक यांना तातडीनं उपचारांची गरज असून त्यांना अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी त्यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टाकडे केली आहे. (Latest Marathi News)

गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना अंतरिम जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी कोर्टात आग्रही मागणी केली आहे. मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात अंतरिम जामीनासाठी आग्रही मागणी केल्यानंतर ईडी कोर्टात आपली बाजू मांडणार आहे. ईडीकडून एएसजी अनिल सिंग हे युक्तिवाद करणार आहेत.

30 जानेवारी 2023 च्या जेजे रुग्णालयाच्या अहवालानुसार, नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, त्यांना अनेक आजार आहेत. मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे. दुसरी किडनीही केवळ 60 टक्के काम करत आहे. याशिवाय त्यांना त्रासही होत आहे. अनेक रोगांपासून आहेत.

वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारू शकते. त्याला पूर्णपणे बनावट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मलिकांची अवस्था पाहता माणुसकीच्या आधारावर अंतरिम जामीनही द्यावा, अशी मागणी नवाब मलिकांचे वकील अमित देसाई यांनी केली आहे .

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय आहेत?

दरम्यान, मुंबईतील कुर्ला भागातील गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. या जागेचे मालक मुनिरा प्लंबर यांनी त्यांची जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिकांनी केली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मदतीने ही जागा हडपल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार करून दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.

मलिक यांच्यावर हे दोन मुख्य आरोप त्यांच्यावर आहेत. या आरोपाअंतर्गत मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात चार्जशिट देखील दाखल केली आहे. मलिक यांनी पैसे हसीना पारकर, सलीम फ्रूट आणि सरदार शहावली खान यांना रोकड पैसे आणि चेकच्या स्वरुपात देखील पैसे दिले होते, असाही आरोप मलिक यांच्या विरोधात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT