दौंड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध सावकारीचा गुन्हा
दौंड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध सावकारीचा गुन्हा - Saam Tv
मुंबई/पुणे

दौंड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध सावकारीचा गुन्हा

साम टिव्ही

पुणे : दौंड Daund शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा NCP माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेश शामराव जाधव याच्या विरोधात महिलेचा विनयभंग आणि सावकारीचा Money Lending गुन्हा दौंड पोलिस Police ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. NCP Leader in Daund arrested for Money Lending

दौंड शहरातील एका महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदावर असलेल्या राजेश जाधव यांने डिसेंबर 2019 मध्ये दोन लाख रुपये महिना 8% टक्के व्याजाने पैसे दिलेले होते. फिर्यादीस दरमहीना 16000 रुपये व्याजाचे पैसे देणे शक्य न झाल्यामुळे राजेश जाधव याने फिर्यादीच्या बहिणीच्या घरामध्ये जाऊन फिर्यादीला अश्लील भाषेत दमबाजी केली.

तसेच मी पैसे कसे वसूल करतो हे साऱ्या दौंडला माहित आहे. अशी भाषा वापरून, तुला जर माझे पैसे देता येत नसतील तर मला वेळ दे म्हणत राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नगरसेवकाने राजेश जाधव याने फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. NCP Leader in Daund arrested for Money Lending

त्यामुळे दौंड पोलिसांनी राजेश जाधव विरोधात महिलेचा विनयभंग करणे आणि सावकरकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंड पोलिसांनी नगरसेवक राजेश जाधव विरोधात महिलेचा विनयभंग करणे तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,45 (अ) (क) अन्वय गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

Dhananjay Munde Speech Beed | धनंजय भाऊंनी सभा गाजवली!

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT