सुशांत सावंत
Dhananjay Munde News : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस सभागृहाचं कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस सत्ताधाऱ्यांच्या आरोप-प्रत्योरापाने चांगलाच गाजत आहे. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
'आम्ही काय केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की शॉपिंग, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला.
धनंजय मुंडे यांनी सभागृगहात भाजप आणि शिंदे गटाला प्रश्न विचारून चांगलेच घेरले. धनंजय मुंडे म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासहित एकूण ४० आमदारांना घेऊन गेले आणि मुख्यमंत्री झाले. रिक्षावाला पासून राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे नगरसेवक देखील चाहते झाले. पण ज्यावेळी नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असे सांगितले, त्यावेळी शिंदे यांचे चाहते नगरसेवक नाराज झाले. हे ४० जणांना घेऊन मुख्यमंत्री झाले, मग आमची संधी का हिरावली असा सवाल त्यांच्याकडून होत आहे'.
'एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय निर्णय घेतला. मुख्यमंत्री झाल्यावर काय निर्णय घेतला. डॉ. संजय कुटे हे सुरतेच्या स्वारीवर गेले, गुवाहाटीवर गेले आणि नंतर गोव्याला गेले. त्यानंतर मुंबईत आले. जर तुमच्या हातात बॅलेट दिले तर तुम्ही कोणाला मुख्यमंत्री केलं असतं ?, असा सवाल करत मुंडे यांनी टीका केली.
'एवढं करून भाजपने काय मिळवलं, हे कळालं नाही. कमीत कमी विरोधीपक्ष नेते पदावर बसले होते, ते पद संवैधानिक होते. जर उपमुख्यमंत्रिपद संवैधानिक नाही, मग तुम्ही काय मिळविले ? मुख्यमंत्री देखील जनतेतून होऊ द्या. १२० आले तरी विरोधीपक्षात राहावे लागले. सत्ता आली तरी उपमुख्यमंत्रिपदी बसावे लागले. आम्ही काय केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की शॉपिंग ?, असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.