Dhananjay Munde News Saam Tv News
मुंबई/पुणे

Dhananjay Munde : मंत्रालयातील बोगस लिपिक भरती प्रकरणावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया; केला महत्वाचा खुलासा

मंत्रालयातील बोगस लिपिक भरती प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rashmi Puranik

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आले आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आली असून, यांपैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात शिपाई असल्याचे भासवत या तरुणांनी एका तरुणाला नोकरी लावून देतो, असे सांगत फसवणूक केली आहे. या बोगस नोकर भरती प्रकरणी देण्यात आलेले पत्र देखील बनावट आहे.

त्यावर असलेले सह्या आणि शिक्के देखील बनावट आहेत. त्यामुळे नोकरी शोधत असलेल्या लोकांनी अशा भामट्यांपासून सावध राहायला हवे, अशा सूचना मुंडे यांनी केल्या.

या प्रकरणी मुंबईतील (Mumbai) गोवंडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT