chhagan bhujbal  saam tv
मुंबई/पुणे

शाळेत सरस्वती शारदेचा फोटो का? भुजबळांचे वादग्रस्त विधान, भाजपची जोरदार टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

chhagan bhujbal news: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात ? असा सवाल छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) केला आहे. त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळ यांच्या विधानावर भाजपचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी भुजबळांनी सरस्वती शारदा मातेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, 'शाळेत सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावा. महात्मा फुले यांचा फोटो लावायला पाहिजे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटा लावा'.

'शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का ? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची ? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी जोरदार टीका केली आहे. 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवतांबाबत एवढी चीड का ? हा खरा सवाल आहे. आज आमच्या देवी-देवतांचे फोटो खटकतात. उद्या आमची मंदिरेही खटकतील. उद्या मंदिरे कशाला पाहिजेत, तीही पाडून टाका म्हणतील', अशा शब्दात राम कदम यांनी टीका केली.

'आता राष्ट्रवादीचे जोडीदार श्रीमान पेंग्विन सेनेची काय भूमिका हे त्यांनी स्पष्ट करावे. सर्व महा पुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत मात्र देवी देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही', असेही राम कदम पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT