मनसे मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार? अमित ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत

आगामी निवडणुकीसाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी सर्व शाखाध्यक्षांच्या सोबत राजगड पक्ष मुख्यालयात बैठकांचा सपाटा लावला आहे.
amit Thackeray news
amit Thackeray news saam tv

रुपाली बडवे

Amit Thackeray News : भारतातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जिंकण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीत मनसे पक्षाची देखील महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. याचदरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुका मनसे (MNS) स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सर्व शाखाध्यक्षांच्यासोबत राजगड या पक्ष मुख्यालयात बैठकांचा सपाटा लावला आहे. (MNS News in Marathi)

amit Thackeray news
मराठा समाजाबाबतचं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांच्या अंगलट; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विरोधकांची मागणी

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवेल असे स्पष्ट संकेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात अमित ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांशी राजगड पक्ष मुख्यालयात बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी शाखाध्यक्षांना दिले आहेत.

शाखाध्यक्षांनी व्यक्त केल्या भावना

मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मुंबईतील परप्रांतीय समाज - विशेषत: उत्तर भारतीय आणि गुजराती समाज मनसेकडे आकृष्ट झाला आहे. हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज सर्वांना भासत असून आगामी निवडणुकीत मराठी माणसासोबत गुजराती तसंच हिंदी भाषिक मतदारही मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान करतील, अशा भावना शाखाध्यक्षांनी व्यक्त केल्या आहेत.

amit Thackeray news
'वेदांता'बाबत MIDC चे पत्र, मविआ नेत्यांचा खोटारडेपणा उघड झाल्याचा भाजपचा दावा

'राज ठाकरे यांनी भोंग्यांचा संदर्भात लिहिलेलं पत्र मुस्लिमबहुल भागात वितरीत करण्यासाठी शाखाध्यक्ष गेले असताना त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. मात्र स्थानिक पातळीवर हिंदू समाज एकवटला आहे, असेही शाखाध्यक्षांनी सांगितले.

'राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिका आणि करोना संकटकाळात मनसे शाखाध्यक्ष तसंच महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं उत्तम सामाजिक कार्य यांमुळे स्थानिक पातळीवर मतदारांच्या मनात मनसेविषयी चांगली भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com