Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून कुणाशी न बोलता अजित पवार का निघून गेले? स्वत: सांगितलं कारण

अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या राजकीय वर्तुळातील चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.

Prachee kulkarni

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा केली. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळेंवर सोपवण्यात आली. शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार हे या कार्यक्रमातून कुणाशी न बोलता निघून गेले. यावरून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या राजकीय वर्तुळातील चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमात कार्यध्यक्ष पदाची घोषणा झाल्यानंतर अजित पवार हे पुण्याकडे निघाले. अजित पवार विमानातून थेट पुण्यात पोहोचले. पुण्यात पोहोचल्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले, 'कार्यक्रमात घोषणा झाल्यानंतर लगेच निघालो. मी समाधानी आहे. मी विमानतळावर पोहोचलो. नंतर काही जणांचे फोन आले. माझ्या नाराजीच्या बातम्या चालवण्यात आल्या. असल्या बातम्या देणं बंद करा. माझा उद्या एक नियोजित राजकीय कार्यक्रम असल्याने दिल्लीतून पुण्यात आलो'.

'मी पुणे विमानतळावर बोलण्याचं ठरवलं होतं. खरंतर आम्ही कमिटी केली होती. या कमिटीमध्ये १६ ते १७ जण होते. या कमिटीत मी सुचवलं होतं की, कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची निवड करावी. मात्र, त्यावेळी पवार साहेबांच्या राजीनामा मागे घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. लोकशाहीत बहुसंख्याच्या मताचा आदर करावा लागतो. त्यापद्धतीने निर्णय घेण्यात आला, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'मी आणि प्रफुल पटेल हे एकाच वेळी खासदार झालो. मी सहा महिन्यांनी राजीनामा दिला. मी राज्याच्या राजकारणात आलो. सुप्रियांचं नाव हे नावाजलेलं आहे. मी राज्याच्या राजकारणात असेन, तर सुप्रिया सुळे या राष्ट्रीय राजकारणात असेन, मी अनेकवेळा सांगितलं आहे. माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.

'कोण कोणाला शह देत नसतं. कार्यध्यक्षपदाच्या निवडीचा प्रश्न आमच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. इतरांनी नाक खूपसू नये. २४ वर्षात पहिल्यांदा मी दिल्लीला गेलो. सर्व उत्तम काम करतील , असं उत्तर अजित पवारांनी विरोधकांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT