Ajit Pawar and Supriya Sule release NCP’s joint manifesto ahead of Pune Municipal Elections. Saam Tv
मुंबई/पुणे

मोफत मेट्रो मोफत बस, दादांचा वादा, राष्ट्रवादीचा पुणेकरांसाठी जाहीरनामा

Ajit Pawar Supriya Sule Share Stage: पुणे महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात... भाजपला टक्कर देताना राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात केली आहे... अजितदादांनी पुणेकरांना काय वादा केलाय ते पाहूया...

Girish Nikam

मुंबई इतकीच पुणे मनपाची निवडणूक चुरशीची झाली आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला टक्कर देतायेत. दोन्ही राष्ट्रवादीने संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करताना पुणेकरांवर आश्वासनांची खैरात केली आहे. मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचा वादा अजितदादांनी केलाय. मुख्य म्हणजे हे आश्वासन कसं प्रत्यक्षात येईल त्याचं आर्थिक गणितही अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे तब्बल अडीच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 'एक अलार्म पाच काम' अशी घोषणा दोन्ही राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली. अजित पवारांनी तर पुणेकरांसाठी एक अष्टसूत्रीच जाहीर केलीय.

मोफत मेट्रो, मोफत बस दादांचा वादा

सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत

सर्व प्रभागांमध्ये दररोज उच्च दाबानं पाणीपुरवठा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज

1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटांपर्यंतची घरे पूर्णपणे मालमत्ता करमुक्त

रस्त्यावर खड्डा पडल्यास 72 तासांच्या आत कंत्राटदाराच्या खर्चानं दुरुस्त करणार

विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह टॅबलेट मोफत

राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यावर पुणेकरांनी मात्र संमिश्र प्रतिक्रीया दिल्यात. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातलं मोफत प्रवासाचं हे आश्वासन गेमचेंजर ठरणार का? याचं उत्तर मात्र 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी मिळणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

SCROLL FOR NEXT