Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार; राज्यभरात सभांचा धडाका, असं असेल वेळापत्रक

Sharad Pawar News: नाशिकच्या सभेनंतर आता बीडमध्येही पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांचा बीडनंतर दुसऱ्या जिल्ह्याचा दौरा देखील ठरला आहे.

Rashmi Puranik

sharad Pawar News: राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी याआधीच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नाशिकच्या सभेनंतर आता बीडमध्ये सभेचे आयोजन केले आहे. शरद पवारांचा बीडनंतर दुसऱ्या जिल्ह्याचा दौरा देखील ठरला आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवारांनी राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शरद पवारांनी पहिली सभा नाशिकच्या येवल्यात घेतली होती. यानंतर आता शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

बीडमध्ये १७ ऑगस्ट रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. पावसाळी अधिवेशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा, अजित पवार गटाची भेट आणि विविध राजकीय घडामोडीमुळे शरद पवारांचा राज्य दौरा लांबणीवर पडला होता. शरद पवार हे १७ ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. बीडनंतर शरद पवार हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?

 शरद पवार हे १७ ऑगस्टपासून सभांचा धडाका लावणार आहेत. पहिली सभा बीड जिल्ह्यात घेणार आहेत. पवार हे बीडपासून सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते विभागवार एकेक जिल्ह्यात सभा घेतील. एका सभेनंतर दहा दिवसांचा ब्रेक घेतील. त्यानंतर पुढची सभा घेतील, अशी माहिती मिळाली आहे.

संदीप क्षीरसागर यांच्याकडे मोठी जबाबदारी

बीडमध्ये १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेच्या तयारीची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर संदीप क्षीरसगार यांनी त्यांचा पाठिंबा शरद पवार यांना जाहीर केला होता.

अजित पवार गटाने बंड केल्यानंतर क्षीरसागर यांनी 'आपण सैदव साहेबांसोबतच', असे जाहीर केले होते. क्षीरसागर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT