Chhatrapati Sambhajinagar: भर बैठकीत राडा! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv
Published On

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला. यावेळी अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

Chhatrapati Sambhajinagar News
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन झालं जागं, चांदशैली घाटातील दरड प्रवण क्षेत्रात बांधल्या जाणार संरक्षण भिंती

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि पालकमंत्री जोरदार बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार करत अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

विरोधी पक्षातील नेत्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप केल्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेही (Sandipan Bhumare) आक्रमक झाले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने वाद आणखी वाढला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.

Chhatrapati Sambhajinagar News
Mumbai BEST Worker Protest: 'तात्काळ कामावर रुजू व्हा अन्यथा...', संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नोटीस

यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निधी कमी मिळणे साहजिक आहे अशी प्रतिक्रिया दिली. पुर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे?" असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com