Sharad pawar and devendra Fadnavis, Sharad Pawar News, devendra Fadnavis News, BJP Morcha News, OBC Resrvation News
Sharad pawar and devendra Fadnavis, Sharad Pawar News, devendra Fadnavis News, BJP Morcha News, OBC Resrvation News Saam Tv
मुंबई/पुणे

OBC Reservation : सत्ता असताना तुम्ही झोपला होता का ?; शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण पदरी पाडून घेतल्यानंतर आता साऱ्यांचे लक्ष आता ठाकरे सरकारकडे लागले आहे. 'ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे ठाकरे सरकारचे षडयंत्र आहे', अशी टीका भाजप नेत्यांनी ( Devendra Fadnavis ) महाविकास आघाडी सरकारवर केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar ) ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation ) भाजप नेते आणि देवेद्र फडणवीसांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.'पाच वर्ष देशात तुमची सत्ता असताना तुम्ही झोपला होता का ?, अशा शब्दात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला आहे. (Sharad Pawar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील ओबीसी पदाधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे मुंबईत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्यासहित राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. या अधिवेशनात पवार म्हणाले, 'ओबीसी जनगणना ही राष्ट्रवादीची मागणी आहे.बिहार राज्यातही नितीश कुमार यांनी देखील ही भूमिका घेतली आहे. कोर्टाने 'इम्पीरिकल डेटा'बद्दल माहिती मागितली. तो डेटा गोळा करायचे काम सुरू आहे. भाजप नेते, माजी मुख्यमंत्री सांगतात की, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत धोका दिला आहे. मग पाच वर्ष देशात तुमची सत्ता असताना तुम्ही झोपला होता का?, अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले, 'ओबीसी आरक्षणावरून भाजपला महाविकास आघाडी सरकारला बोलण्याचा अधिकार नाही. ओबीसी वर्गाला काही मिळेल आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील हे भाजपला मंजूर नाही. भाजप नेते फक्त टीका करतात, असा टोलाही शरद पवारांनी भाजप नेत्यांना लगावला. 'ओबीसी जनगणना केंद्र सरकारने करावी. जनगणनेनुसार न्याय वाटणी व्हावी. कोणी इथे फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. ओबीसी आरक्षणासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway : मध्य रेल्वेची मोठी कारवाई! एका महिन्यात २१ दलालांना अटक, साडे तेरा लाखांची तिकिटंही जप्त

M. S. Dhoni : MS धोनीसंदर्भात मोठी बातमी! IPL मधील निवृत्तीवरून CSK चे मालक काशी विश्वनाथन यांचं मोठं वक्तव्य

Secondhand Car : सेकंडहॅन्ड वाहनांसंदर्भात मोठी बातमी; १.९२ कोटी वाहनांचं चार वर्षांनी काय होणार? जाणून घ्या

What Is Form 17C: फॉर्म 17C काय आहे? ज्याचा डेटा सार्वजनिक करण्याची विरोधी पक्ष करत आहे मागणी; जाणून घ्या

Sixth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचाराला लागला ब्रेक, कन्हैया कुमारसह या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT