sharad pawar  saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar | एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात : शरद पवार

'सुप्रिया सुळे राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Sharad Pawar News : 'सुप्रिया सुळे राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल अंदाज कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका जुन्या मुलाखतीमधील अंदाजावर भाष्य केले.

पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येत आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील मुलाखतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

या मुलाखतीमधील कार्यक्रमात शरद पवारांची एक जुनी मुलाखत लागली, यात शरद पवार म्हणाले, माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं नाही. तिला तशी इच्छा पण नाही'. या चुकलेल्या अंदाजावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही खळकळून हसले. या चुकलेल्या अंदाजावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल अंदाज कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल'.

शरद पवार हे स्त्री दृष्टीकोनावर पुढे म्हणाले, 'माझ्यावर झालेल्या संस्काराचे श्रेय माझ्या आईचे आहे. घरात कोणी शिक्षित नव्हते. आईने आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली. निवडणुकीला उभा राहिलो आणि एका गावात गेलो. तिथे लोक म्हणाले तुम्हाला मत देतो पण एकच मुलगी ? अग्नी कोण देणार ? म्हणजे लोकांना अग्नीची चिंता'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Maharashtra News Live Update: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT