राज ठाकरेंनी सांगितला अजय-अतुल यांच्या आईचा 'तो' किस्सा; महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे केले वर्णन

संगीतकार अजय-अतुल यांच्या आई या मला नेहमी खाद्य महोत्सव पुन्हा कधी भरवताय हे विचारत असतात, असा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे आयोजित अन्नपूर्णा पाककला स्पर्धेच्या कार्यक्रमात सांगितला.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

Raj Thackeray News : विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र जेवण कसं असतं. ही खाण्याची विविधता महाराष्ट्रात आहे. याआधी देखील महाराष्ट्राचा खाद्य महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे संगीतकार अजय-अतुल यांच्या आई या मला नेहमी खाद्य महोत्सव पुन्हा कधी भरवताय हे विचारत असतात, असा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे आयोजित अन्नपूर्णा पाककला स्पर्धेच्या कार्यक्रमात सांगितला.

Raj Thackeray
Ajit Pawar : सत्तेची मस्ती उतरवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे ; पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सावित्री प्रतिष्ठान व कलकी फाउंडेशन मार्फत अन्नपूर्णा पाककला स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. दादर सानेगुरुजी शाळते होणाऱ्या या स्पर्धेत १५० अधिक महिला पाककला स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना राज ठाकरे यांनी संबोधित केले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील जेवणाचे वर्णन देखील त्यांनी केले.

Raj Thackeray
Shivsena : दसरा मेळावा शिवाजी पार्कातच! शिवसेनेच्या बैठकीत निर्धार

राज ठाकरे म्हणाले, ' मी जरा चुकीचं वेळ काढली आहे. मला नागपुरला निघायचं आहे. मला नेहमी वाटायचे महिला घर काम करण्यात खूप कष्ट घेत असते. आम्ही महाराष्ट्र खाद्य महोत्सव आयोजित करत असतो. या महोत्सवातून महाराष्ट्रातील खाण्याची विविधता एकत्र आणतो. महाराष्ट्राच्या लाडके संगीतकार अजय-अतुल यांच्या आई या मला नेहमी खाद्य महोत्सव पुन्हा कधी आयोजित करणार आहात, हे विचारत असतात. त्यामुळे मी शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता यांच्याशी बोललो'.

'घरी बसलेल्या महिलांना कोणता पदार्थ चांगला करता येऊ शकतो, आपल्या हातून काय घडू शकतं हे लोकांना दिसू द्या हे त्यांना सांगितले. या कल्पनेतून हे सर्व साकार होत आहे'. असे राज ठाकरे पुढे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी या स्पर्धेतील सहभागी महिलांना शुभेच्छा देखील दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com