Sharad Pawar-prakash Ambedkar Meet: Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात शरद पवार-प्रकाश आंबेडकरांची भेट? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणातून मोठं वृत्त समोर आलं आहे. पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. राज्यातील दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झालं आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, पुणे

Sharad Pawar-prakash Ambedkar Meet:

राज्याच्या राजकारणातून मोठं वृत्त समोर आलं आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. राज्यातील दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झालं आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या भेटीचा इन्कार केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यात मोदी बागेत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या भेटीचा इन्कार केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश आंबेडकरांनी फेटाळला भेटीचा दावा

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या भेटीचा दावा प्रकाश आंबेडकरांनी फेटाळला आहे. मोदी बागेत नातेवाईकांची भेट घेतल्याची स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे. या कथित भेटीनंतर राजकीय वर्तुळात आगामी लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली असावी, असं तर्कवितर्क लावले जात आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी लोकसभा जागावाटपावरून भेट झाली का, अशीही चर्चा सुरु आहे.

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार राहतात, त्याच इमारतीत प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक राहतात. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन बहिणी मोदी बागेतील इमारतीत राहतात. त्यांना भेटण्यासाठी गेलो असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर माझं नेहमी येणं-जाणं असतं, असंही ते म्हणाले.

तत्पूर्वी, शरद पवारही आज घरी आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांची भेट झाली का, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

SCROLL FOR NEXT