पुण्यात राष्ट्रवादी भाजपला विचारते 'क्या हुआ तेरा वादा'? अमोल कविटकर
मुंबई/पुणे

पुण्यात राष्ट्रवादी भाजपला विचारते 'क्या हुआ तेरा वादा'?

पुणे महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसा पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू पुढे जातोय.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

अमोल कविटकर

पुणे: पुणे महापालिकेची निवडणूक Election of Pune Municipal Corporation जसजशी जवळ येतेय तसतसा पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू पुढे जातोय. एरवी समोरासमोर होणारे आरोप-प्रत्यारोप कमी होते म्हणून की, काय आता भाजपा आणि राष्ट्रवादीचं 'पॉलिटिकल वॉर' सोशल मीडियावर Social Media रंगलं आहे.

हे देखील पहा-

२०१७ साली पुण्यात सत्तेवर येताना भारतीय जनता पक्षाने मोठमोठी आश्वासने दिली. यात मोठ्या प्रकल्पांसह विविध आश्वासनांचा समावेश होता.. मात्र हा सत्तेचा कार्यकाळ पूर्ण होत असताना महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादीने भाजपविरोधात थेट सोशल मीडियात मोहीम सुरू केलीये. क्या हुआ तेरा वादा? असे या मोहिमेचे नाव असून यात भाजपला रोज एक प्रश्न विचारला जातोय.

पुण्यात मेट्रो, भामा आसखेड. चोवीस तास पाणीपुरवठा, इलेक्ट्रिक बस अशा योजना झाल्या असल्या तरी पुणेकरांचं जगणं अजूनही सुसह्य झालंय, असं म्हणता येणार नाही. शिवाय पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध अजूनही झालेल्या नाहीत आणि नेमका हाच धागा राष्ट्रवादीने पकडलाय. दुसरीकडे मात्र रोज एक प्रश्न विचारण्यापेक्षा राष्ट्रवादीने गेल्या पंधरा बजेटमधून पुण्यासाठी काय केलं? असा प्रश्न भाजपनेही विचारला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे.त्यामुळे सत्तासंघर्षाचा हे राजकारण दिवसंदिवस आणखी विकोपाला चाललंय. त्यातच प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियातूनही भाजपला घेण्याचा प्रयत्न विरोधात राष्ट्रवादी करते. मात्र या सगळ्या वादात पुणेकर नेमकी काय भूमिका घेतील? यावरच दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून असेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT