Amol Mitkari vs Amey Khopkar  
मुंबई/पुणे

VIDEO : ‘हर हर महादेव’वरून रणकंदन; मिटकरी-खोपकरांमध्ये बाचाबाची, ठाण्यात काल रात्री काय घडलं?

'हर हर महादेव' या मराठी सिनेमावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

साम टिव्ही ब्युरो

ठाणे : 'हर हर महादेव' या मराठी सिनेमावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. ठाण्यात एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला तर दुसरीकडे मनसेचे अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यादरम्यान, मनसेचे अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात बाचाबाची देखील झाली. (Amol Mitkari vs Amey Khopkar Latest News)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने ठाण्यासह अनेक चित्रपटगृहातील शो बंद पाडले. सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले.

त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. मात्र काही वेळानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद पाडलेला शो पुन्हा सुरु केला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी याबाबत बोलताना संताप व्यक्त केला. त्याचवेळी अमोल मिटकरी आणि खोपकर यांच्यात साम टिव्हीसोबत बोलताना जोरदार खडाजंगी झाली.

मिटकरी खोपकरांमध्ये बाचाबाची पाहा व्हिडिओ

दुसरीकडे ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'प्रेक्षकांशी वाद झाला नाही. मात्र, एका व्यक्तीशी कार्यकर्त्यांचा वाद झाला. तो का झाला असावा, तुम्हालाही ठाऊक आहे. सिनेमात दाखवले जाणारे आम्हाला मंजूर नाही. हा शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. जो इतिहास आम्ही ऐकलाच नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात आहे. त्याच्या विरोधात आम्ही आहोत. यात राजकारण नाही'.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT