पुणे: देशाला काळिमा फासणाऱ्या व्यक्तींचा उदोउदो करण्याची गरज नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात दहशतवादी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीवरुन सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. ते आज हवेली दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
'ज्या व्यक्ती चांगल्या असतात त्यांच्याबाबत चांगल्या गोष्टी घडाव्यात. मात्र, ज्या व्यक्ती देशाला काळिमा फासणाऱ्या असतात, समाजाला घातक असतात अशा व्यक्तींचा उदोउदो करण्याचं कारण नाही,' असं पवार म्हणाले.
तसंच यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली, राज्यातील सरकार अद्याप स्थिरस्थावर नाही. कोर्टात प्रकरण चालू आहे. कोर्ट तारीख पे तारीख देत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही कळत नाही की, सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल, यांनी कितीही आव आणला तरी त्यांच्यावर टांगती तलवारअसल्याचंही पवार म्हणाले.
शिवाय भाजपला (BJP) महागाईवर बोलता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही, त्यामुळे नवनवीन मुद्दे उपस्थित करुन भाजप लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करत असल्याचा आरोप त्यांनी भाजवर केला. तर तज्ञांचं मत आहे की, शिवसेनेचा सर्व निकाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने लागेल. मात्र, कोर्टात तारीख पे तारीख सुरू असल्याने आम्हालाही काही सांगता येणार नाही.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) न्यायालय निर्णय घेईल, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती आणि त्याच मैदानावरून सांगितले होते की इथून पुढे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे ही जबाबदारी निभावतील आणि तेच बाळासाहेबांचं आणि शिवसैनिकांच म्हणणं असल्याचंही पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.