Chhagan Bhujbal Saam TV
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? अंजली दमानिया यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Chhagan Bhujbal Join BJP? : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तसा दावा केला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महायुतीत मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नेते मराठा आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत, तर ओबीसी नेते, छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत.

याच मुद्द्यावरुन छगन भुजबळ पक्षात एकाकी पडल्याची चर्चा सुरु आहे. छगन भुजबळ नाराज असल्याची देखील चर्चा होती. मात्र आता छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तसा दावा केला आहे. (Latest News)

अंजली दमानिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप.'

मात्र छगन भुजबळ खरंच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून भाजपमध्ये जाणार का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार?

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी देखील पक्षाला सोडचिट्ठी देण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशाना सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी यांना अजित पवार गटाकडून राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT