NCB ची कौतुकास्पद कामगिरी; वर्षभरात केलं इतक्या कोटींचं ड्रग्ज जप्त !
NCB ची कौतुकास्पद कामगिरी; वर्षभरात केलं इतक्या कोटींचं ड्रग्ज जप्त ! SaamTV
मुंबई/पुणे

NCB ची कौतुकास्पद कामगिरी; वर्षभरात केलं इतक्या कोटींचं ड्रग्ज जप्त !

सुरज सावंत

मुंबई : मागील वर्षभरापासून ड्रग्ज Drugs विरोधी कारवाईचा NCB ने धडाकाच लावला आहे. डोंगरीतील 'डी गँग'चे ड्रग्ज कारखान्यावरील कारवाई पासून ते अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज पार्ट्यांविरोधात एनसीबीने केलेल्या अनेक कारवायांमध्ये सर्वाधिक चर्चेत आली ती म्हणजे कॉर्डेलिया क्रूझवरील Cordelia Cruise ड्रग्ज पार्टीची वर्षभर मुंबईसह गोवा Mumbai Goa परिसरात NCB ने कारवाईचा सपाटा लावत तब्बल 100 कोटी ड्रग्ज पकडले आहे. तर 305 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. (NCB's commendable performance in seizing drugs throughout the year)

हे देखील पहा -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर NCB ने बाँलीवूडमधील (Bollywood) ड्रग्जचे सेवन करणारे आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात शोध मोहिम राबवली. या कारवाई संपत नाही तोच NCB ने कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करत अभिनेता शाहरूख खानच्या मुलासह 19 जणांना बेड्या ठोकल्या, या कारवाईचे कनेक्शन परदेशातील ड्रग्ज तस्करांशी जोडले गेल्याचा दावा NCB ने न्यायालयात केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

दिवसेंदिवस NCB च्या ड्रग्ज विरोधी कारवाईंचा आलेख हा वाढतच जात आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख म्हणून समीर वानखेडे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पदभार स्विकारल्यापासून ड्रग्ज तस्कारांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी पदभार स्विकारल्यापासून गेल्या वर्षी 46 कारवाई करत 111 जणांना अटक केली. यात 11 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर यावर्षी 98 गुन्हे नोंदवत 198 जणावरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 32 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

NCB न कारवाई दरम्यान इतकं ड्रग्ज केलं जप्त

कोड़ियन 101.5 किलो, चरस 41 किलो, हीरोइन 8 किलो, गांजा 318 किलो, इफेड्रिन 10.5 किलो, मेफेड्रोन 14 किलो इतकं ड्रग्ज जप्त केलं आहे. तसेच NCB नुसती ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांवरती कारवाई करत नाही. तर त्यांचं समुपदेशनही करते. ड्रग्जच्या आहारी गेलेले तरुण किंवा तरुणी पून्हा त्या मार्गाकडे वळणार नाहीत. यासाठी NCB चे विशेष प्रयत्न असतात. या व्यक्तींना शारीरिक आणि कौटुंबिक परिणाम समजावून सांगतात.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT